टेरेसवरून थेट पहिल्या मजल्याच्या पत्र्यावर कोसळली तरुणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेरेसवरून थेट पहिल्या मजल्याच्या पत्र्यावर कोसळली तरुणी

अग्निशमन दलाच्या जवानांनी तिची सुटका केली

नालासोपारा प्रतिनिधी : नालासोपारामधील सेंट्रल पार्क येथील रजनी अपार्टमेंटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारी श्रुती पांडे ही 19 वर्षाच

कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन
आंचल चिंतामणीने मिळविले दुसर्‍यांदा सुवर्णपदक
पोलिसांनी जप्त केली 49 शस्त्रे आणि पकडले 130 जणांना ; मागील दहा महिन्यांची कामगिरी, 55 गुन्हेही दाखल

नालासोपारा प्रतिनिधी : नालासोपारामधील सेंट्रल पार्क येथील रजनी अपार्टमेंटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारी श्रुती पांडे ही 19 वर्षाची मुलगी रविवारी संध्याकाळी सहा वाजता इमारतीच्या टेरेसवर गेली होती. मोबाईलवर बोलत असताना तिचा फोन हातातून सटकला आणि टेरेसच्या सज्जावर पडला. ती मोबाईल काढायला खाली वाकली पण तिचा तोल गेला आणि पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या पत्र्यावर पडली. ही माहिती मिळताच आचोळे येथील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ही मुलगी टेरेसच्या पत्रावर अडकली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्याच्या घराच्या खिडकीची ग्रील कापून पत्र्यावर गेले आणि तिची सुटका केली.

COMMENTS