संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई प्रतिनिधी - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच

2024 ला सरकार बदलेल,सगळ्यांचा हिशोब हा केला जाईल
संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी
संजय राऊतांना अबू्रनुकसानीच्या खटल्यात जामीन

मुंबई प्रतिनिधी – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांच्या जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे ईडीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत वाढ केली आहे. तसंच, न्यायालयाने राऊत यांना संसदीय कामकाजाबाबत पत्रांवर सह्या करण्यास परवानगी दिली आहे.

COMMENTS