आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे; मात्र रुग्णालय प्रशासनाने दावा फेटाळून लावला आहे.
बीड/प्रतिनिधीः आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे; मात्र रुग्णालय प्रशासनाने दावा फेटाळून लावला आहे. परळी पाठोपाठ आता आंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातदेखील ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. 2 आणि 3 वार्डात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे; मात्र हा आरोप रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी फेटाळला आहे.
बीड, आंबेजोगाई, परळी आणि आष्टी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आज सकाळपासूनच परळीतील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. आंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातदेखील ऑक्सिजनचा पुरवठा घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेड संख्या 225 असून दररोज 800 सिलेंडरची मागणी आहे; मात्र ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने लातूर, बीड या ठिकाणाहून ऑक्सिजन मागवण्यात आला आहे; परंतु पुरवठा कमी असल्याने प्रशासनदेखील हतबल झाले आहे.
61 रुग्णांचे जीव टांगणीला
घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे 61 रुग्णांचे जीव टांगणीवर लागले आहेत. रुग्णालयाची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात आज सकाळपासून ऑक्सिजनचा साठा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
COMMENTS