गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठर
गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षात कोरोना महामारीच्या निमित्ताने अनेकदा पुर्णत: तर अनेकदा अंशत: लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, आता लॉकडाऊन संपवण्यात आले आहे. मात्र, साथीच्या आजाराने आपला परतीचा प्रवास सुरु केला असल्याचे दिसून येत नाही. उलट परिस्थितीनुसार विषाणू स्वत:च्या जणूकीय रचनेत बदल करून मानवाच्या पाठीमागे हात धुवून लागला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. मात्र, नेमका कोणत्या व्हेरियंटचा प्रार्दुभाव झाला आहे. याबाबतच्या तपासण्या करण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करण्याची बाब बनली आहे. गेल्या चार दिवसापासून सुरु झालेल्या गणेशोत्सवानिमित्त ग्रामीण भागासह शहरी भागात चांगलीच उलाढाल वाढल्याचे दिसून येत आहे. ही उलाढाल बाजार पेठेला उर्जितावस्था मिळवून देणारी आहे. मात्र, या निमित्ताने खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दीचा विचार केल्यास साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून काडीचीही तयारी केलेली दिसून येत नाही. उलट आरोग्य विभागात रिक्त पदे असल्याचे निमित्त सांगून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लोकांनी स्वत: सोडवण्यास आरोग्य विभागाची काहीही हरकत नाही, असे जणू काही भासवले जाते. शहराच्या नुसत्या कचरा कुंड्या पाहिल्यास समजून येईल. गेल्या चार महिन्यापासून जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या पदाधिकार्यांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थावर आता प्रशासकाची सत्ता आली आहे. हा प्रशासक त्याची सत्ता जास्त दिवसाची नाही हे समजूनच लोकांना न्याय देण्यापेक्षा लोकांना वटणिवर आणण्याच्या भाषा बोलत असल्याचे पहावयास मिळत आहे. सरकारी तिजोरीतील पैसा विकास कामासाठी कसा खर्च करावा, यासाठी महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शहरी भागासाठी नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून जनतेच्या पैशातून जनतेचा विकास करण्याचा त्रिसुत्री कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांचा कार्यकाल संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रशासक शासनाला अभिप्रेत असलेले काम मात्र त्यातून त्या-त्या परिसरातील विकास कामे सुरु राहण्यापेक्षा कटकट नको, असे म्हणून टाळाटाळ करत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचे कोणतेही सोयरसुतक या प्रशासकास नसल्याचे पहावयास मिळत आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांनी बनविलेले देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना पहावयास मिळत आहे. मोठ-मोठ्या शहरात यासाठी विशिष्ट यंत्रणा काम करत असते. मात्र, जिल्हा पातळीवरील तसेच तालुका पातळीवर व मोठ्या गावात अशी यंत्रणा काम करताना पहावयास मिळत नाही. आरोग्य विभागाने नियुक्त केलेले कर्मचारी त्यांच्या स्वत:च्या कामाच्या वेळेत कधीही लोकांना सेवा देत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणात आणणे जिकिरीचे बनत आहे. त्याचाच परिणाम सामान्य जनतेच्या आरोग्यावर होत असतो. उत्सवादरम्यान होत असलेली गर्दी भविष्यात मोठ्या संकटाचे कारण तर बनणणार नाही ना? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. आजचे सरकार उद्या असेल असे नाही, अशा अस्थिरतेमध्ये सामान्य जनतेचा बळी जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
COMMENTS