भाजप ठरवणार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप ठरवणार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सप्टेंबरमध्ये मुंबई दौरा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबई दौर्यावर येणार आहेत. या दौर्याच्या वेळी अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शनही घेणार आहेत. मुंब

मराठा आरक्षण आंदोलकांची राजकीय भूमिका; ओबीसींची पोकळी का?
ऐन उन्हाळ्यात मिरचीच्या भावाचा ठसका
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबई दौर्यावर येणार आहेत. या दौर्याच्या वेळी अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शनही घेणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहा यांच्या दौर्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौर्यात शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर चर्चा करणात आहेत.
अमित शहा हे लालबागच्या राजाचे भक्त आहेत. शहा दरवर्षी आपल्या कुटुंबीयांसोबत गणपतीचे दर्शन घेतात अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली आहे. तसेच यंदाही अमित शहा मुंबई दौर्यावर येणार असून लालबागच्या राजाचे दर्शन घेतील असेही भाजप नेत्यांनी सांगितले. लालबागच्या राजाच्या दर्शनाशिवाय अमित शहा मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतील. शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. शहा आणि शिंदे यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणूकीवर चर्चा होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शहा यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे. गेली 30 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेचेनी सत्ता आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यावर ताबा मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. 2017 साली राज्यात भाजप शिवसेना युती असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हा शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. मनसेला अवघ्या 7 जागांवर यश मिळाले होते, त्यानंतर 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेत सामील झाले होते. शिवसेनेला मुंबई महानगरपालिका राखण्यात यश आले होते. यंदा मुंबई महानगरपालिकेसाथी 236 जागांवर निवडणूक खोणार आहे. त्यापैकी 134 जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने मुंबईचे वॉर्ड 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेचे 227 वॉर्ड ठेवण्यात आले होते. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी आपल्या पद्धतीने मतदारसंघांची पुर्नरचना केली होती असा आरोप भाजपने केला होता. मुंबई महानगरपालिका निवडणूकीपूर्वी शिंदे गटाची आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटातील नगरसेवक फोडण्याची आणि शिवसेना कमकुवत करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे गटाकडे देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे.

COMMENTS