परभणी प्रतिनिधी - परभणी जिल्ह्यात बैलपोळ्याच्या सण मोठ्या उत्सवात साजरा केला. अशात जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाला गालबोट लागलं. बैलपोळा स
परभणी प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात बैलपोळ्याच्या सण मोठ्या उत्सवात साजरा केला. अशात जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाला गालबोट लागलं. बैलपोळा साजरा करण्यावरून जिंतूर तालुक्यातील चांदज गावात दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. दोन गटात झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. बैलपोळा फोडण्यावरून ही हाणामारी झाली असून दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी पोलीस पथकासह तातडीने चांदज गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० ते २५ जणांचा ताब्यातही घेतलं आहे.
COMMENTS