बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं पदक निश्चित.

Homeताज्या बातम्यादेश

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं पदक निश्चित.

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारून देशासाठी पदक निश्चित करणारी ही पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरलीय.

 सध्या सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने आपली उत्कृष्ट खेळी दाखवत विजयी पताका रोवली. सात्विकसाईराज रँकिरेड

फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला
गिल, कोहलीचे श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक
‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24

 सध्या सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने आपली उत्कृष्ट खेळी दाखवत विजयी पताका रोवली. सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जपानी जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा पराभव करून आपले पहिले पदक निश्चित केले. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारून देशासाठी पदक निश्चित करणारी ही पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरलीय. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकाच्या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करत विजेतेपदाच्या दावेदार आणि गतविजेत्या जपानी जोडीला २४-२२, १५-२१, २१-१४ अशा गुण फरकांनी पराभूत केले. उपांत्य फेरीत दाखल होत प्रथमच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये स्वतःसाठी देखील त्यांनी पदक निश्चिती केली आहे.

COMMENTS