उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तीन मजली इमारतीला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घड
उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तीन मजली इमारतीला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घराच्या खाली जुन्या टायरच्या भंगाराचे गोदाम होते, त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घरात एकूण 12 लोक राहत होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मृतांमध्ये 7 वर्षीय नाफिया, 3 वर्षीय इबाद, 12 वर्षीय उमेमा, 35 वर्षीय शमा परवीन, 65 वर्षीय कमर आरा यांचा समावेश आहे. या घरात शुक्रवारी दोन मुलींचे लग्न होणार असल्याचे सांगण्यात आले, ज्याच्या तयारीत संपूर्ण कुटुंब गुंतले होते. दरम्यान मंडपाचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. त्यानंतर आगीमुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले.
COMMENTS