सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली

सिलिंडरचा गॅस लिकेज होऊन भीषण स्फोट

डोंबिवली प्रतीनिधी-  घरात सिलिंडरचा गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील गायकवाड वाडी परिसरात घडली आहे. धक्क

पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
आता गॅस सिलेंडरवर मर्यादा ; वर्षभरात केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार
पुजेसाठी अगरबत्ती पेटवली असता गॅस सिलेंडर झाला स्फोट.

डोंबिवली प्रतीनिधी-  घरात सिलिंडरचा गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील गायकवाड वाडी परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या दोन घरांचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मनिषा मोरवेकर, उर्सुला लोढाया आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा रेयांश लोढाया अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

COMMENTS