मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक.

एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये झरी विनायक मंदिराच्या समोरील रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभी

पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!
भर रस्त्यात डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं
शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.

रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये झरी विनायक मंदिराच्या समोरील रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती या दोन वाहनांचा अपघात झाला आहे. मालवाहू ट्रक पावसहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रत्नागिरी वरून पावसच्या दिशेने येणाऱ्या छोटा हत्तीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत छोटा हत्ती मधील 2 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. भीषण अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS