पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना काठीने चोपले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना काठीने चोपले

पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घडवली अद्दल कोल्हापुर मधील घटना

कोल्हापूर प्रतिनिधी - मागील जवळपास आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना आणि ओढ

शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी
सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मोदींची तिसरी इनिंग नितीश-नायडूंवर अवलंबून

कोल्हापूर प्रतिनिधी – मागील जवळपास आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना आणि ओढ्यांनाही पूर आलेला आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहत पुराच्या ठिकाणी जाऊ नये तसेच पुरातून प्रवास करू नये, असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार देण्यात येत आहे. मात्र, अनेकजण याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत.याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच कोल्हापूरमधून समोर आली. पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना पोलिसाने अशी अद्दल घडवली की ते नेहमीच लक्षात ठेवतील. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. एका पोलिसाने या नागरिकांना अद्दल घडवण्याची जबाबदारी घेतली. व्हिडिओमध्ये दिसतं, की या पुराच्या पाण्यामधून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिस चोप देताना दिसत आहे, या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो व्हायरल झाला आहे.

COMMENTS