Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माकडाने लहान मुलीचा घेतला चावा

संगमनेर मध्ये माकडाचा धुमाकूळ

अहमदनगर प्रतिनिधी -  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील साकुर(Sakur) ग्रामपंचायत हद्दीत गेल्या पाच ते सात दिवसापासून माकडांनी धुमाकूळ घातल्याचे बघायल

पंतप्रधानांनी बचत गटांची दखल घेणे अभिमानास्पद ः स्नेहलता कोल्हे
पुणतांब्यात आज रेल्वे रोको आंदोलन
उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

अहमदनगर प्रतिनिधी –  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील साकुर(Sakur) ग्रामपंचायत हद्दीत गेल्या पाच ते सात दिवसापासून माकडांनी धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये माकड हे लहान मुलांना निशानावर घेत जखमी करत असल्याचं बघायला मिळत आहे .दरम्यान एका लहान मुलीला माकडाने चावा घेतला आहे. सध्या तिच्य्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून शैक्षणिक संकुलाच्या परिसरामध्ये माकड येऊन शाळेतील मुलांना जखमी करायचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे पालक वर्गाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे .गेल्या चार ते पाच दिवसापासून वनविभाग माकडाचा शोध घेत आहे पण वन विभागाला सुद्धा माकड पकडण्यात अपयश येता येत असल्याचे बघायला मिळत आहे . वन विभागाने लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त करा अशी ग्रामस्थ पालक करून मागणी केली जात आहे.

COMMENTS