राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार : राणे

Homeताज्या बातम्याशहरं

राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार : राणे

पोलिस प्रशासनाला गर्भीत इशारा, सनी पवारची घेतली भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात आता महाविकास आघाडी सरकार नाही, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफही नाहीत, नवाब मलिकही आता नाहीत. राज्यात आता देवेंद्र फडणवीस व

घोगरगाव ग्रामसभेचा ठराव होऊनही कारवाई नाही
माजी आमदार मुरकुटे यांना जामीन मंजूर
’तनपुरे’च्या संचालकांची चौकशीचे खंडपीठाचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात आता महाविकास आघाडी सरकार नाही, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफही नाहीत, नवाब मलिकही आता नाहीत. राज्यात आता देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार आहे व कोणी मस्ती केली तर त्यांच्याकडे सर्व गोष्टींंवर औषध आहे, असा गर्भीत इशारा भाजपचे आ. नितेश राणे यांनी सोमवारी येथे दिला. दरम्यान, त्यांनी व आ. गोपीचंद पडळकर यांनी नुपूर शर्मा यांचा स्टेटस ठेवल्याने कर्जतमध्ये हल्ला होऊन जखमी झालेल्या सनी उर्फ प्रतीक राजेंद्र पवार या युवकाची रुग्णालयात भेट घेतली तसेच नंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचीही भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. जिल्हा हॉटस्पॉट होत आहे, पंतप्रधान मोदी जसे देशात स्वच्छता अभियान राबवत आहेत, तशी तुम्हीही येथे स्वच्छता मोहीम राबवा, असा सूचक सल्लाही राणेंनी पोलिस अधीक्षक पाटील यांना दिला. मागील 4 ऑगस्टला कर्जतमध्ये सनी पवार या युवकावर जीवघेणा हल्ला झाला. आपसातील जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांकडून म्हटले जात असले तरी, वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याने तुझा उमेश कोल्हे करू असे म्हणत त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 14 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात दोन अल्पवयीन मुले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आ. राणे व आ. पडळकर यांनी जखमी पवारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व नंतर पोलिस अधीक्षक पाटील यांचीही भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

महाविकास आघाडीवर टीका
अमरावतीची घटना घडली तेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्यामुळे त्या काळात जिहाद्यांची हिंमत वाढली होती व वाढवलीही जात होती. पण आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे यापुढे कोणालाही हिंदू धर्माला टार्गेट करण्याची हिंमत करू देणार नाही, असा इशारा देऊन आ. राणे म्हणाले, सनी पवार या युवकावर हल्ला झाल्यावर तो जुन्या भांडणातून झाल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे. मात्र, तू खूप हिंदू-हिंदू करतो तसेच नुपूर शर्माचा डीपी ठेवतो, असे म्हणून त्याला जीवघेणी मारहाण झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. प्रकृतीच्या कारणाने त्याला रुग्णालयात कोणाला भेटू दिले जात नाही. पण त्याच्याशी आरोपींनी केलेल्या व्हॉटसअ‍ॅप चॅटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व नुपूर शर्मा यांच्याविरोधी भाष्य आहे व त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना देऊन या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असल्याचेही राणे यांनी सांगितले. दरम्यान, यापुढे कोणाही हिंदूला कोणी धमकी दिली वा मारहाण केली तर आधी पोलिसांकडे तक्रार करावी व नंतर हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधावा, त्यांना आम्ही संरक्षण देऊ, असेही आ. राणेंनी आवर्जून स्पष्ट केले.

तपास प्राथमिक अवस्थेत : पाटील
सनी पवार हल्ला प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. मागील भांडणाची त्याला पार्श्‍वभूमी आहे, पण काहीअंशी जातीय तसेच नुपूर शर्मांशी संबंधित पोस्टमुळे हल्ला झाल्याचाही संदर्भ आहे. पण सर्व अँगलने पोलिसांचा तपास सुरू आहे, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे तपास दिला आहे, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. आम्ही कायद्यानुसार तपास करीत आहोत तसेच अधिक खोलात जाऊन तपास करू व दोषींवर कठोर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आ. राणे यांनी माझ्याकडे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, बहुदा तपास अधिकार्‍यांकडे ते दिले असावेत, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

COMMENTS