शाब्बास दरेकर !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शाब्बास दरेकर !

प्रविण दरेकर हे नाव आता सहकार क्षेत्रात आता सक्षम नाव म्हणून पुढे येत आहे. तसं सहकार क्षेत्रात काॅंग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी. या मक्तेदारीला थोड्

अहमदनगर : रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्याचे महापौरांचे आदेश
व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच पतीची केली भयानक अवस्था | LOKNews24
नागपुरमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या

प्रविण दरेकर हे नाव आता सहकार क्षेत्रात आता सक्षम नाव म्हणून पुढे येत आहे. तसं सहकार क्षेत्रात काॅंग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी. या मक्तेदारीला थोड्याफार प्रमाणात इतर कोणी आव्हान दिलेले या दोन्ही पक्षांना सहन होत नाही. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. एव्हाना, सहकार क्षेत्रात त्यांच्या असण्यालाही आव्हान देण्यात आले. त्यासाठी सहकार क्षेत्राच्या ज्या कॅटेगिरीतून ते सदस्य झालेले होते, त्या सगळ्या बाबी उकरून काढण्यात आल्या. त्यांच्या विरोधात कारवाईचा ओघ वाढवीत त्यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरूनच नव्हे तर इतर पदांवरूनही हटवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न, खासकरून राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आला होता. पण सत्ताबदल झाल्यानंतर पुन्हा प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर निवड झाली; ही बाब खरोखर अभिनंदनीय म्हणावी लागेल. अर्थात, या सगळ्या घडामोडी घडविण्यात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही मोठा सहभाग आहे, हे निश्चितपणे नमूद करावे लागेल. सर्व तातडीच्या मिटींग आणि कामकाज सोडून अचानकपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. त्या अनुषंगाने अनेक तर्क – वितर्क केले जात होते.  बहुधा, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बोलणी करून प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर आणले गेले असावे, अशा तर्काला पुष्टी निश्चितपणे मिळते. सहकार क्षेत्रात एकाच समुदायाची निर्माण झालेली मक्तेदारी तशीच रहावी, यासाठी काॅं-राष्ट्रवादी काॅंग्रेस यांचा सातत्याने प्रयत्न सुरू राहतो. सहकार क्षेत्र हे खरेतर, तळागाळातील लोकांना आर्थिक स्तरावर उन्नत करण्याचे माध्यम. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र विस्तारले गेले. अनेक साखर कारखाने उभारले गेले. त्या अनुषंगाने करोडोंचा निधी जमिनी आणि त्या सारखी लागणारी सगळी यंत्रणा या सहकार क्षेत्रासाठी उभी केली गेली. परंतु हे सहकार क्षेत्र समाजातील आर्थिक गरीब घटकांसाठी न राबवता ती आता या दोन पक्षातील नेत्यांची मक्तेदारी झाली आहे. यातील सामूहिक आणि सामाईक असणारे तत्व केव्हाच हद्दपार झाले आहे. सहकार क्षेत्रातील अनेक कारखाने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वैयक्तिक मालकीचे झालेले आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अतिश्रीमंत आणि त्यातून सत्तेच्या समीकरणात सातत्याने राहण्याचा प्रयास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आजपर्यंत केला गेला. त्यास प्रवीण दरेकरांच्या सारख्या नेतृत्वाने दिलेले आव्हान, हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. प्रवीण दरेकर यांच्या विरोधात कारवाई करणारे महाविकास आघाडीतील नेते हे सरकार क्षेत्रातील धुतल्या तांदळासारखे आहेत, असे कोणीही मानायला तयार नाही. परंतु, त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून सहकार क्षेत्रात कोणी उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हे दोन्ही पक्ष किंवा या दोन्ही पक्षांचे नेते कसे एकत्र येतात, हे आपण यापूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात झालेल्या कारवाईतून पाहिले होते. प्रविण दरेकर यांनी मुंबई बॅंकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राची घेतलेली पकड ही प्रेरक बाब आहे. मात्र, इतर कोणीही व्यक्ती सहकार क्षेत्रात आपली पाळेमुळे खोलवर रूजवत असेल तर त्याविरोधात सहकार क्षेत्रात मक्तेदारी मिरवणारे कसे एकत्र येतात, हे आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी पाहिले होते. त्या कारवाई ला उरून पुरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाकडे पहावे लागेल. प्रविण दरेकर यांच्या सहकार क्षेत्रात झालेल्या या पुनर्वसनाचे आम्ही अभिनंदन करतो!

COMMENTS