करोडपती?….नव्हे , तो आला रोड वरती ; लकी विनर मेसेजद्वारे एकाला सव्वा लाखाला गंडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करोडपती?….नव्हे , तो आला रोड वरती ; लकी विनर मेसेजद्वारे एकाला सव्वा लाखाला गंडा

अहमदनगर/प्रतिनिधी : कौन बनेगा करोडपतीमध्ये विनरचे झाल्याचे आमीष दाखवून नगरमधील एका तरुणाला ऑनलाईन सव्वा लाखाचा गंडा घातला गेला. 1 लाख 33 हजार 200 रुप

संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षाच्या मुलाला पळविले
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग ; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू | Lok News24
कोपरगाव आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी : कौन बनेगा करोडपतीमध्ये विनरचे झाल्याचे आमीष दाखवून नगरमधील एका तरुणाला ऑनलाईन सव्वा लाखाचा गंडा घातला गेला. 1 लाख 33 हजार 200 रुपयांच्या फसवणुकीच्या या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील सर्जेपुरा भागातील रामवाडी परिसरात लक्ष्मीमाता मंदिराजवळ राहणार्‍या एका 29 वर्षीय व्यक्तीला 3 अज्ञात मोबाईलधारकांनी ऑनलाईन गंडा घातला आहे. नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात याबाबत सोमवारी (दि. 1 ऑगस्ट) सायंकाळी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मजुरी करतात. एक दिवस त्यांना 8291822919 या मोबाईल नंबरवरून कॉल आला की, आम्ही कौन बनेगा करोडपतीमधून बोलत आहोत. तुमचा मोबाईल क्रमांक हा लकी विनर म्हणून निवडला आहे. त्यावरून तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी देण्यात येत आहे. त्यानंतर 9837882930 या दुसर्‍या नंबरहूनही असाच कॉल आला. या दोन्ही मोबाईल क्रमांक धारक व्यक्तींनी त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्‍वास संपादन केला तसेच 25 लाखाची लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी व इन्कमटॅक्सच्या नावाखाली सुरुवातीला काही पैसे 7021259015 या गुगल पे अकौंटवर पाठविण्यास सांगितले. त्यांनी काही पैसे पाठविले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांना फोन आला की तुमचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आले आहे. त्याची प्रोसेसिंग फी म्हणून त्यांना काही पैसे एका बँक खात्यात पाठविण्यास सांगितले. त्या बँक खात्याचा अकौंट नंबर व आयएफएससी कोडही पाठविण्यात आला. 25 लाख रुपये मिळणार या आशेवर फिर्यादी यांनी या भामट्यांना दि. 20 ऑगस्ट 2021 ते 10 मार्च 2022 या कालावधीत तब्बल 1 लाख 33 हजार 200 रुपये गुगल पे तसेच बँक खात्यावर पाठविले. त्यानंतर तीनही मोबाईल नंबर बंद झाले. अनेक वेळा संपर्क करुनही त्या मोबाईलधारकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही व त्यांना लॉटरीचे पैसेही मिळाले नाहीत. या दरम्यानच्या काळात ऑनलाईन फ्रॉडच्या काही बातम्या नारायण अरुणे (रा. सर्जेपुरा) यांच्या वाचनात आल्या. त्यामुळे आपलीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. 1) सायंकाळी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS