महाराष्ट्र हे राज्य देशात कायम प्रगती पथावर राहिले आहे. समृध्द समतावादी विचार, त्यातून सर्व प्रकारचे भेदमुक्त जीवन महाराष्ट्रातच अनुभवायला मिळते. त्य
महाराष्ट्र हे राज्य देशात कायम प्रगती पथावर राहिले आहे. समृध्द समतावादी विचार, त्यातून सर्व प्रकारचे भेदमुक्त जीवन महाराष्ट्रातच अनुभवायला मिळते. त्यातच विकसित महाराष्ट्रातील लोकांचा झालेला भौतिक विकास आणि त्यांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे, इतर रांज्यात ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळवणे कठीण होते, अशा लोकांनी थेट मुंबई आणि महाराष्ट्राचा रस्ता धरला. आज मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात महाराष्ट्राबाहेरील लोक व्यवसाय करण्यासाठी स्थिरावले आहेत. गुजराती हे प्रामुख्याने मुंबईत आले, ते मुळातच गुजरातची नसलेली क्रयशक्ती या कारणाने. तसाही गुजराती व्यावसायिक हे स्वतः मेहनत करणारा व्यवसाय कधीच करित नाहीत. मध्यस्थ असणं हाच त्यांचा सर्वोच्च व्यवसाय. कोणत्याही व्यवसायात उत्पादक किंवा विक्रेता आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ राहणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. महाराष्ट्र हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असल्याने येथे मध्यस्थ या शब्दाला देखील प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्राच्या भाषेत मध्यस्थ म्हणजे दलाल. दलाल या शब्दाला देखील सामाजिक प्रतिष्ठा नाही. आज देशात ज्या गुजराती उद्योगपतींना जगातील श्रीमंतांच्या यादीत टाकले जाते त्यांचे नेमके उत्पादन काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारार्थी असेल. संपत्ती उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होते. व्यापारातून फक्त ग्राहकांचे आर्थिक शोषण केले जाते. मुंबई आणि महाराष्ट्रातील गुजराती माणूस अशा प्रकारे मराठी माणसाचे शोषण करीत आहे. राजस्थानातून येणारे व्यापारी खासकरून मिठाई आणि फरसाण च्या व्यापारात दिसतात. सणासुदीच्या दिवसांत जेव्हा मोठ्या प्रमाणात मिठाई बाजारात यायला लागते तेव्हा अन्न – औषधे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या चौकशीत अनेक नकली पदार्थांचा वापर करून त्या मिठाई बनविल्या जात असल्याचे निष्पन्न होते. आता या राजस्थानी व्यापाऱ्यांनी आणखी एक नवाच प्रकार अंमलात आणला आहे, तो म्हणजे भव्य मिठाई – फरसाण केंद्र बनवायची परंतु, तिथे रोजगार कुणालाही मिळू नये म्हणून सेल्फ सर्व्हिस हा प्रकार अवलंबला जातो. म्हणजे, आपल्या पैशांनी माल विकत घेऊन आपणच नोकर बनून तो आपल्या पुढ्यात आणायचा. असे भलते-सलते व्यापार चालवणाऱ्यांना महाराष्ट्राने अक्षरशः लक्षाधीश केले आहे. महाराष्ट्रात वास्तव्याला असणारे परप्रांतीय इथे पैसा कमवून त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबतात. हे सगळं पाहिलं तर मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांना समजून घेण्याचे कष्ट ज्यांना घेता येत नाहीत, त्यांची वक्तव्य बेताल होत जातात. देशात सर्वाधिक परप्रांतीय जर कोणत्याही एखाद्या शहरात अधिक असतील तर ते महानगर म्हणजे मुंबई महानगरच होय. मुंबई आणि महाराष्ट्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. त्यामुळेच मुंबई विषयी किंवा मुंबईतील मराठी माणसांविषयी कुणी गैर उद् गार काढले तर अख्ख्या महाराष्ट्राला ते जिव्हारी लागतं. हीच खरी आत्मियता आहे. महाराष्ट्र हे एक स्वतंत्र अस्मिता असणारे राज्य आहे. राज्यातील जनता भौतिक दृष्टीने पुढे गेली ती कुणाचे शोषण करून नव्हे; तर, आपल्यात गुणवत्ता निर्माण करून. त्यांची ही गुणवत्ता देशातील इतर प्रांतीयांचाही आर्थिक विकास घडवणारी आहे. त्यामुळे, इतर प्रांतियांनी महाराष्ट्राप्रति कायम कृतज्ञ रहायला हवे. अर्थात, भारत हे एकसंघ राष्ट्र असून त्यातील लोकांमध्ये भेद करू नये, अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. कारण भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला संचार स्वातंत्र्य बहाल करते. त्या संचार स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये, अशी समज सर्वांना यावी, ही आमची तळमळीची भूमिका आहे.
COMMENTS