फडणवीसांच्या मर्जीतील बिल्डरची कार जप्त ; हिरेन हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांच्या मर्जीतील बिल्डरची कार जप्त ; हिरेन हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट

सचिन वाझे प्रकरणात एटीएसने अजून एक महागडी कार जप्त केली आहे.

कराड विमानतळाची जागाच शेतकर्‍यांना परत करा: डॉ. भारत पाटणकर
ओबीसी समाजाने राजकीय एकजूटीतून सर्वपक्षीयांना धडा शिकवावा!
हिंदू-मुस्लिम बांधवानी रक्तदान करत दिला एकतेचा संदेश

मुंबई/प्रतिनिधी : सचिन वाझे प्रकरणात एटीएसने अजून एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात आली आहे. ही गाडी वाझे याच्या बिझनेस पार्टनरची असल्याचे सांगण्यात येते. एटीएस आणि फॉरेन्सिक टीमकडून या कारची तपासणी करण्यात येत आहे. ही कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधल्या एका बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजवरुन टाकण्यात आली आहे. 

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्वीस्ट! महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनीष भतिजांची? भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर. मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्वीस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे, ती बिल्डर मनीष भतिजा यांची असल्याचे समजते. भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात. ‘मनिष भतिजा प्रसाद लाड यांचे व्यावसायिक पार्टनर.’याच भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी 24 एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते, त्या प्रसाद लाड यांचे हे भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. 

नवी मुंबईतील सुमारे 1767 कोटी रुपयांची ही जमीन फडणवीस यांनी अवघ्या 3.6 कोटी रुपयांत भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे.

COMMENTS