आईला सांभाळायचे कुणी…भावाचा भावावर कोयत्याने वार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईला सांभाळायचे कुणी…भावाचा भावावर कोयत्याने वार

अहमदनगर/प्रतिनिधी : वृद्ध आईला सांभाळायचे कुणी यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने लहान भावाच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना केडगाव

शहरातील मध्यवर्ती भागात मद्य परवाना देवू नका
दोन पोलिस एकमेकांना भिडले…सीसीटीव्हीत कैद झाले
अहमदनगर शहर हे खडडेमुक्त करा

अहमदनगर/प्रतिनिधी : वृद्ध आईला सांभाळायचे कुणी यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने लहान भावाच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना केडगाव परिसरातील मोहिनीनगर येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, संजय पांडुरंग पाचारणे (वय 50 वर्षे, रा. बुरूडगाव, नगर) हा त्याचा भाऊ राजू पाचारणे याच्याकडे मोहिनीनगर (केडगावदेवी मंदिरामागे) येथे आईला भेटण्यासाठी जेवण घेऊन गेला असता भाऊ सध्याकाळी घरीच होता. त्यावेळी तो म्हणाला की मी आईचे किती दिवस करायचे? आपण दोघेजण भाऊ आहोत. त्यावर संजय त्याला म्हणाला की, आपण एकत्र बसून 11 किंवा 22 महिने तीस सांभाळू म्हणून. त्यावर तो म्हणाला की, तुम्हीच आईस सांभाळा, तुम्हाला नोकरी आहे. त्यावर संजय त्याला म्हणाला की तू आईची पेन्शन खातो, मग तुला काय होते सांभाळायला? याचा राग त्याला येऊन त्याने संजयला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर याच्या नादाला लागण्यास काही अर्थ नाही म्हणून संजय त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला असताना व घराच्या बाहेर काढलेले शूज घालत असताना राजू पाचारणे याने अचानक त्याच्या डोक्यात स्टीलचा कोयता मारून डोक्यामध्ये जबर दुखापत करून गंभीर जखमी केले. त्यावर संजय याने त्यास जोराने ढकलले असता तो खाली पडला. त्याच्या हातातील स्टीलचा कोयता त्याच्या हातातून निसटल्याने त्याने लाकडी दांड्याने उजव्या दंडावर मारला व संजयच्या मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी घरातील भाडेकरू महेश दांगडे याने संजयला सिव्हिल हॉस्पिटल येथे आणून दाखल केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी संजय पाचरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू पाचारणे याच्याविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली. पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS