सरकारमध्ये आणखी किती वाजे दडले आहेत ?; माधव भांडारी यांचा सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारमध्ये आणखी किती वाजे दडले आहेत ?; माधव भांडारी यांचा सवाल

राज्यसरकारमध्ये सचिन वाजे यांच्यासारखे किती अधिकारी दडले आहेत असा सवाल भाजपा प्रदेशउपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी उपस्थित केला.

राजधानीत ओएनडीसी स्टार्टअप महोत्सव उत्साहात
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई : राज्यसरकारमध्ये सचिन वाजे यांच्यासारखे किती अधिकारी दडले आहेत असा सवाल भाजपा प्रदेशउपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी उपस्थित केला. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो, असेही भांडारी यांनी नमूद केले. 

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. भांडारी म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती सचिन वाजे प्रकरणातून स्पष्ट झालीआहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळया कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे , अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्याआणि त्यांच्याकडून वाजेंकरवी जी कामे करून घेतली जात होती , ती कामे करून घ्या , अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. वाजें सारखे किती अधिकारी सरकार मध्ये दडले आहेत हेकळले पाहिजे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणामुळे ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करा , असे निर्देश दिले आहेत. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत , असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याच बरोबर देशमुख यांनाही या याचिकेत पक्षकार करून घ्या असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे . तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असेही भांडारी यांनी नमूद केले.

COMMENTS