शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना महिला नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण.

शिंदे गटात येण्यासाठी मारल्याचा आरोप.

सांगली प्रतिनिधी- इस्लामपूर(Islampur) मधील शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे(Shiv Sena corporator Pratibha Shinde) यांच्या पतीला सात ते आठ जणांच्या टो

इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक
निवडणूक कर्मचार्‍यांना चक्रीका अ‍ॅप बंधनकारक : अतुल म्हेत्रे
‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : कृषीमंत्री दादाजी भुसे

सांगली प्रतिनिधी- इस्लामपूर(Islampur) मधील शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे(Shiv Sena corporator Pratibha Shinde) यांच्या पतीला सात ते आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली आहे. शिवकुमार शिंदे(Shivkumar Shinde) असे मारहाण झालेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी ही मारहाण झाल्याचा आरोप प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती शिवकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मारहाणीत शिवकुमार शिंदे जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

COMMENTS