Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्कर येवूनही चालकाचे प्रसंगावधान; बस शेतात घालून प्रवाशी सुरक्षित

पाचवड / वार्ताहर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाई तालुक्यातील भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आली. तरीही चालकाने प्रसंगावधान राखत ब

महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान
वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक
सातारा पालिकेचा दणका; बड्या थकबाकीदारांकडून कोट्यवधी वसूल

पाचवड / वार्ताहर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाई तालुक्यातील भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आली. तरीही चालकाने प्रसंगावधान राखत बस सर्व्हिस रोडवरून उसात घालून मोठा अपघात टळला. सुदैवाने बसमधील 40 प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून तासगावला निघालेली एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रोडवरून बसस्थानकच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक चालकाला चक्कर येऊन उलटी झाली. तो स्टेरिंगवर कोसळणार इतक्यात त्याने स्वतःला सावरत बस रस्त्याच्या बाजूच्या उसाच्या शेतात घातली. यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य करत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बसचालक प्रदीप प्रमोद माताडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांना उपचारासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
अपघातानंतर बसचे मोबाईलमधून फोटो काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भांडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, बापूराव धायगुडे, राजेश कांबळे यांनी प्रवाशांना बाहेर काढले.

COMMENTS