शिवसेना कुणाची?; निवडणूक आयोग करणार फैसला!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना कुणाची?; निवडणूक आयोग करणार फैसला!

बहुमताचे पुरावे सादर करण्याचे ठाकरे-शिंदे गटाला नोटीस

नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर झाले असले तरी अनेक घटनात्मक पेच प्रलंबित आहेत. शिंदे गटाने शिवसेनेतून बाहेर पडले असले तरी आम्हीच शिवसेना असून, आमच्याकड

मणिपुरमध्ये राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट
मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब
देशाचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे ते संपवू शकणार नाही-प्रणिती शिंदे 

नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर झाले असले तरी अनेक घटनात्मक पेच प्रलंबित आहेत. शिंदे गटाने शिवसेनेतून बाहेर पडले असले तरी आम्हीच शिवसेना असून, आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा त्यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची, असा सातत्याने वाद सुरु आहे. हा लढा आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात गेला आहे. आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश दिला आहे.
निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी करणार आहे. यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही कोणाकडे राहणार याबाबतही 8 ऑगस्टला फैसला होणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. बंडानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा केल्याने शिवसेनेने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव घेत आमची बाजू समजावून घेतल्याशिवाय याबाबत कोणताही निर्णय देऊ नये अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पक्षावरच दावा केला गेल्याने शिवसेना आणि शिंदे गटाने यांनी यासंदर्भातील पुरावे 8 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. असा पेचप्रसंग राज्यात प्रथमच निर्माण झाल्याने त्यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी सर्वतोपरी शहनिशा केली जात आहे. तर काही कायदेतज्ञ हे शिवसेना ही उध्दव ठाकरे यांच्याकडेच राहणार असा दावा करीत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटात सहभागी होणार्‍यांची संख्या ही वाढत असल्याने शिवसेना ही शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमके काय होणार हे तर 8 ऑगस्टनंतरच समजणार आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात आला आहे. याबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आधी सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरु होती आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन आपला निर्णय जाहीर करेलं. यासाठी दोन्ही बाजूच्या गटांना 8 ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

8 ऑगस्टपर्यंत पुरावे द्यावे लागणार
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेली शिवसेना आता नेमकी कुणाची ? असा सवाल आज उपस्थित झाला आहे. शिवसेनेतून निर्माण झालेल्या शिंदे गटामुळे हा पेच निर्माण झाला आहे शिवाय कोर्टाकडूनही तारीख पे तारीख दिली जात असल्याने आता उत्सुकता शिघेला पोहचली आहे. यामध्ये नेमका निर्णय काय होणार हा प्रश्‍न केवळ राजकीय नेत्यांनाच नाहीतर प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. याबाबत आता शिवसेनेने आणि शिंदे गटाने कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. एवढेच नाहीतर 8 ऑगस्टपर्यंत दुपारी 1 पर्यंत हे पुरावे सादर करावे लागणार आहेच. त्यामुळे आता शिवसेना कुणाची ह्या प्रश्‍नाचे उत्तर 8 ऑगस्टच्या सुनावणीनंतरच मिळणार आहे.

COMMENTS