अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात 2 जवान ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात 2 जवान ठार

पुंछ : जम्मू-काश्मिरातील पुंछ जिल्ह्याच्या सुरनकोट येथे अंतर्गत वादातून सैन्याच्या जवानांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये दोन जवान मृ

धुळे जिल्हा निरीक्षकपदी बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती
विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाकडून जिवदान
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको : छगन भुजबळ | LOKNews24

पुंछ : जम्मू-काश्मिरातील पुंछ जिल्ह्याच्या सुरनकोट येथे अंतर्गत वादातून सैन्याच्या जवानांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये दोन जवान मृत्यूमुखी पडले असून इतर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टेरिटोरियल बटालियनच्या या जवानांची सकाळी 6 वाजता परेड होणार होती, त्यापूर्वी सैनिकांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. प्रकरण इतके वाढले की सैनिकांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, परेडसाठी देण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर करून काही जवानांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जवान गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून बटालियनमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. या सर्वांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.

COMMENTS