भुशी धरणात बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा मृतदेह सापडला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुशी धरणात बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा मृतदेह सापडला

पुणे : भुशी धरणात बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा मृतदेह मंगळवारी सापडला. धरणात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथक तसेच पोलिसांनी मो

तरुणाचा दरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न | LOK News 24
राहुरी तालुक्यात दुसरा डोस घेणारांना प्राधान्य ; लसीकरण नव्या पॅटर्नमुळे गर्दीवर नियंत्रण
पाटणा शहरातील गोळीबारात दोघांचा मृत्यू

पुणे : भुशी धरणात बुडालेल्या मुंबईतील तरुणाचा मृतदेह मंगळवारी सापडला. धरणात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथक तसेच पोलिसांनी मोहिम राबविली होती. साहिल सरोज (वय १९, रा. मुंबई) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबईतील तरुणांचा गट वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात सोमवारी (११ जुलै) आला होता. साहिल आणि त्याचे मित्र दुपारी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे गेले होते. धबधब्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत होता. प्रवाहात साहिल वाहून गेला आणि भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यातून तो २५ ते ३० फूट उंचीवरून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबविली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवक प्रणय अंबुरे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, ओंकार पडवळ, आयुष वर्तक आदींनी मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून भुशी धरण परिसरात शोधमोहीम राबविली. पाण्यात बुडालेल्या साहिलचा मृतदेह दुपारी बाहेर काढण्यात आला.

COMMENTS