अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात, 40 भाविक अजूनही बेपत्ताच

Homeताज्या बातम्यादेश

अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात, 40 भाविक अजूनही बेपत्ताच

जम्मू : गेल्या 8 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा

लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात नागरिकावर गोळीबार| LokNews24
बॉलिवूडमधील काहींना कोरेनासंबंधीची कामे ; नीलेश राणे यांचा आरोप ; ठाकरेंवर उखळ पांढरे करून घेतल्याची टीका
नाशिक जिल्ह्यात एकूण २२ हजार दाखले प्रलंबित

जम्मू : गेल्या 8 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा गट पवित्र अमरनाथ गुफेच्या दर्शनासाठी रवाना झाला परंतु, ढगफुटीच्या घटनेत बेपत्ता झालेल्या 40 भाविकांचा अद्याप शोध लागलेला नाही.
अमरनाथ गुहेजवळ 8 जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे 40 जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात सैन्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याकडून 4 हजार रडार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगार्‍याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे. दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी त्यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असे आश्‍वासन दिले आहे.

COMMENTS