राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात रालोआच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसद

झोमॅटोच्या कर्मचार्‍यास लुटणार्‍या टोळीवर मोक्का
जालन्यात दोन गटात तुफान राडा; सरपंचालाही मारहाण
भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात रालोआच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच, द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांकडून समर्थन मागितलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समर्थन मागितलं आहे. एनडीएचे उमेदवार मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून केली. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. 2013 मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात 2000-2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह 6 ऑगस्ट 2002 ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. द्रौपदी मुर्मू या 2000 आणि 2004 मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2015 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, निवडून आल्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसर्‍या महिला राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या ओडिशातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही असतील. राजकारण आणि समाजसेवेत त्यांनी जवळपास दोन दशके काम केले आहे.

COMMENTS