काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

शेतकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देताना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली व ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
तरूणाची बसवर दगडफेक ः महिला प्रवाशी जखमी
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट

अहमदनगर : शेतकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देताना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली व ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाख़ाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्यावतीने निदर्शने करून शेतकरी, कामगार विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्यावतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख यांच्यासह अनंतराव गारदे, खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, उषा भगत, सुमन कलापहाड, शबाना शेख, मंगल साठे, लता वाघमारे, भिंगार काँग्रेसचे रिजवान शेख, सागर दळवी उपस्थित होते. यावेळी बोलताना काळे म्हणाले, शंभर दिवस उलटून गेले व सुमारे तीनशेहून अधिक शेतकर्‍यांचा उपोषणादरम्यान दिल्ली सीमेवर मृत्यू झाला. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीला जाऊन पोहोचल्या. भविष्यात गॅसची किंमत देखील हजारापर्यंत पोहोचल्यास आश्‍चर्य वाटू नये. मात्र, केंद्रातील भाजप सरकार यावर कोणतीही ठोस पावले उचलायला तयार नाही, ही देशवासीयांसाठी अत्यंत खेदाची बाब आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात केंद्राच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका भविष्यात घेतली जाईल, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला.

राज्यभर निदर्शने

मुंबईत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले तसेच काँग्रेस नेत्यांनी तर श्रीरामपूरमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकार्‍यांनी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी उपोषण केले. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. नगर शहरात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.

COMMENTS