जूनमध्येही दहावी, बारावीची परीक्षा देण्याची व्यवस्था

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जूनमध्येही दहावी, बारावीची परीक्षा देण्याची व्यवस्था

कोरोनामुळे दहावी, बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 सरकारच्या मरणाचं तोरण विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं आहे – आ. अमोल मिटकरी 
घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार- भाजपची घोषणा (Video)
जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद

मुंबई/प्रतिनिधीः कोरोनामुळे दहावी, बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही, तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.

COMMENTS