पुणे विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया 15 जूनपासून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया 15 जूनपासून

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये सुरू असलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून

राज्यात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक
सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन
आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा ः मुख्यमंत्री शिंदे  

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये सुरू असलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार आहे.विद्यार्थ्यांना दि.17 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा साधारण 20 जुलैनंतर होण्याची शक्यता आहे. याबाबतचे परिपत्रक येत्या एक-दोन जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया येत्या दि. 15 जून ते 17 जुलै या कालालवधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये 13 पदवी अभ्यासक्रम सुरू असून, त्यासाठीची परीक्षा केवळ एकच दिवस राहणार आहे. तर, इतर दिवशी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विविध सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

COMMENTS