पंकजा मुंडे समर्थक मुकूंद गर्जे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडे समर्थक मुकूंद गर्जे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक

पाथर्डी /प्रतिनिधी : भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्ज

श्रीरामपुरात पोलिस ठाण्यातच अधिकार्‍याला धक्काबुक्की व मारहाण
मूलभूत प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन ः हर्षदाताई काकडे
ठेवीदारांचे पैसे देण्यास नव्या संचालकांची आडकाठी?

पाथर्डी /प्रतिनिधी : भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी  विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.सदरील घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरातील एका कार्यालयात घडली.मुकुंद गर्जे हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना वेळोवेळी भारतीय जनता पार्टी कडून कसं टाळून त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे अशी भावना सोशल मिडीयावर व माध्यमाना मुलाखत व्यक्त करत असताना घडला.
माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते,विधानपरिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.त्यानंतर गर्जे याना तात्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेयावेळी गर्जे म्हणाले,परळी विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी कटकट कारस्थान रचले हे राजरोसपणे भाजप विरोधी पक्षातील कार्यकर्ते व नेते सांगत आहे.तो पराभव आपल्याच लोकांमुळे झाला आहे.भारतीय जनता पार्टी राज्यात सत्तेत असताना माजी मंत्री पंकजा मुंडे त्यांच्याकडे जलसंधारण खाते होते.ते अतिशय उत्तम प्रकारे चालून चांगले काम केले.त्यांना आणखी एक मंत्री पद न देता त्यांना डावलण्याचे काम पक्षाने केले.त्यावेळीही मुंडे यांना साथ दिली नाही.हे सर्व प्रकारचा निषेध म्हणून आम्ही वेळोवेळी निदर्शने केली.आता मी थकलो आहे अशी खंत व्यक्त केली.राज्याची असो अथवा केंद्रीय निवडणूक इतकेच नाही तर सर्वच  निवडणूकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा भाजप पक्ष प्रचार करून मते मिळवतात.या राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही,आम्ही फक्त पंकजा मुंडे यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत.मी वेळोवेळी आंदोलन करून थकलोय पंकजा मुंडे यांच्यावर अनेक आघात झाले त्याचा निषेध म्हणून आम्ही पुतळे जाळले,निषेध केलाय आता आम्हाला सहन होत नाही कुठेतरी थांबावं असं वाटत , पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक आंदोलने केली मात्र त्यांच्यावर चे आघात काही कमी झालेले दिसत नाही.आता आंदोलन पेक्षा मी माझ्या भावना व्यक्त करून आज मी हे पाऊल उचलत आहे. असे म्हणून मुकुंद गर्जे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला बाजूला असलेल्या कार्यकर्त्यांनी गर्जे यांना मिठी मारून रोगराचा डबा बाजूला सरावात त्यांना विष घेण्यसापासून रोखले.यावेळी सर्वच कार्यर्त्यांची एकच धावपळ उडाली.

COMMENTS