शिवनेना नेते यशवंत जाधव यांना ईडीची नोटीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवनेना नेते यशवंत जाधव यांना ईडीची नोटीस

मुंबई : येत्या काही दिवसांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असतानांच शिवसेनेच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समि

जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या
भरदिवसा चोरट्याने दुचाकी नेली पळवून; घटना CCTV मध्ये कैद .
सुपा शहरात लाठीचार्ज विरोधात पाळला बंद

मुंबई : येत्या काही दिवसांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असतानांच शिवसेनेच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांना कोटयवधींची माया जमवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती असताना त्यांनी हजारो कोटींची माया जमवली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव, श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असून ते हेमंत करकरेंच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असा आरोप केला होता. यशवंत जाधव यांची आयकर विभागाच्या वतीने चौकशी सुरु असून ईडीतर्फेही त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आता या प्रकरणात यशवंत जाधवांना वारंवार नोटिसा येणार असून त्यांची कसून चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले. यशवंत जाधव यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले, ’यशवंत जाधव यांनी प्रधान डीलर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून सगळा काळा पैसा पांढरा केला आहे. 1 रुपयाचा शेअर थेट 500 रुपये होतो आणि सगळा काळा पैसा हा पांढरा केला जातो, असा हा प्रकार आहे. हा सगळा पैसा जाधव यांनी आखाती देशात गुंतवल्याचंही सोमय्यांनी सांगितले. याच संदर्भात यशवंत जाधवांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

COMMENTS