नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँगे्रसला लागलेली गळती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेल याने काँगे्रसचा राजीन
नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँगे्रसला लागलेली गळती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेल याने काँगे्रसचा राजीनामा दिल्यानंतर काँगे्रसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
सिब्बल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून, त्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सिब्बल यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या नियुक्तीपासून पक्षांतर्गत बदलांची मागणी करत वेगळी भूमिका घेतली होती. यात माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. मात्र, आता कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितलं की त्यांनी 16 मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले, समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला आहे. ते सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जातील. राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा होईल.
मोदी सरकार विरोधात आघाडी उघडणार
राज्यसभेचा अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, मला वाटते जेव्हा एका अपक्ष उमेदवाराचा आवाज येईल तेव्हा लोकांना हा उमेदवार कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही असं वाटले. आम्ही विरोधी पक्षात राहून मोदी सरकारला विरोध करता यावा यासाठी आघाडी तयार करू इच्छितो. 2024 मध्ये असे वातावरण बनावे की मोदी सरकारच्या सर्व चुका लोकांपर्यंत पोहचतील. मी यासाठी प्रयत्न करेल. मी 16 मे रोजीच काँग्रेस पक्ष सोडला. मला उत्तर प्रदेशमधील सर्वांचा पाठिंबा असल्याचे सिब्बल यांनी जाहिर केले.
COMMENTS