जगभरात मंकीपॉक्सने वाढवली चिंता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगभरात मंकीपॉक्सने वाढवली चिंता

केंद्राचा अलर्ट, राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेला कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असतांना, आता पुन्हा एकदा मंकीपॉक्स व्हायरसचे संकट जगभरात घोंघावतां

ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी
एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढल्या
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा आतापर्यंत 96 लाख महिलांना लाभ

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेला कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असतांना, आता पुन्हा एकदा मंकीपॉक्स व्हायरसचे संकट जगभरात घोंघावतांना दिसून येत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे विविध देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून विविध राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.
मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य जुनोटिक रोग असून त्याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेकडून देण्यात आली आहे. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या देशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मंकीपॉक्सचे इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्र सरकार देखील अलर्ट झाले आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत यंत्रणांना लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या या सूचनेची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील मंकीपॉक्सबाबत गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.


मंकीपॉक्सच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या गाईडलाइन्स
– मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये गेल्या 21 दिवसांत प्रवास केलेल्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार.
– या संशयित रुग्णांबाबतची माहिती स्थानिक जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना.
– मंकीपॉक्सच्या संशयित रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– संशयित रुग्णांच्या तपासणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाणार.
– संशयित रुग्णांची थुंकी आणि रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ ओळख करून त्यांना क्वारंटाईन केले जाईल.
– संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बर्‍या होईपर्यंत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होईपर्यंत रुग्णाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात ठेवण्यात येईल.


काय आहेत लक्षणे?
आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स विषाणू सामान्य आजार आहे. हा फक्त काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धरण करू शकतो. मात्र बहुतेक संक्रमित रुग्ण अल्पावधीत बरे होतात. ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे या विषाणूने प्रभावित रुग्णामध्ये दिसून आली आहे. या विष्णूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहर्‍यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

COMMENTS