Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामेरी येथील कब्बडी स्पर्धेचे निकाल जाहीर; सडोली, कासेगाव, इस्लामपूर, तासगाव, कौलव संघ पहिल्या फेरीत यशस्वी

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथे शनिवारी विश्‍वशांती व्यायाम मंडळाच्या वतीने निमंत्रित संघासाठी सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्

फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडीक
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
फलटण पोलिसांकडून गुटखाविरोधी कारवाई; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथे शनिवारी विश्‍वशांती व्यायाम मंडळाच्या वतीने निमंत्रित संघासाठी सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भैरवदेव पतसंस्था संस्थापक सुनील पाटील बापू व कादंबरीकार व शिवसेना नेते दि. बा. पाटील यांचे हस्ते व बंडाकाका पाटील, छगन पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, संग्राम पाटील, योगेश पाटील, मारुती पाटील, तानाजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धा प्रो कबड्डीच्या नियमानुसार सांगली जिल्हा कबड्डी असोशिएशन यांच्या मान्यतेने होणार आहेत.
आज झालेल्या साखळी सामन्यात राजारामबापू पाटील कासेगाव संघाने छावा शिरोली संघाचा 10 गुणांनी, स्वराज्य फौंडेशन तासगावने राष्ट्रसेवक तळसंदे संघाचा 18 गुणांनी, क्रांतिसिंह कासेगाव संघाने क्रांतिसिंह येडेमच्छिंद्र संघाचा 4 गुणांनी, शाहू सडोली संघाने शिवाजी वाळवा संघाचा 25 गुणांनी व जयंत स्पोर्ट्स इस्लामपूर संघाने उत्कर्षा सांगली संघाचा 29 गुणांनी, इस्लामपूर व्यायाम मंडळाने तळसंदे संघाचा 18 गुणांनी, शिवमुद्रा कौलव संघाने युवक मराठा सांगलीवाडी संघाचा 8 गुणांनी पराभव करून पहिल्या फेरीतील सामने जिंकले. कासेगाव संघातील राष्ट्रीय खेळाडू वैभव वाघमोडे या खेळाडूने उत्कृष्ट चढाई करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेचे संयोजन विश्‍वशांती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष नंदूकाका पाटील, उपाध्यक्ष अशोक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे राजाराम पाटील, विकास पाटील, महेश पाटील, संतोष पाटील, रणजित इनामदार, जयराज पाटील यांचे सह आजी-माजी खेळाडू करत आहेत. स्पर्धेचे ओघवत्या भाषा शैलीत समालोचन करून राजेंद्र सोनवलकर पाटील यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुरेश पाटील यांनी केले. पंच प्रमुख म्हणून विजय देसाई यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 25000, 20000, 15000, 10000 अशी रोख बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. यावेळी कामेरी येथील युवा उद्योजक शुभम तुकाराम पाटील यांनी या स्पर्धेतील संयोजक विश्‍वशांती व्यायाम मंडळाला 101 स्पोर्ट्स किट भेट दिली.

COMMENTS