दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील साम्राज्यवादाच्या समर्थनार्थ मांडणी करणाऱ्या इतिसज्ञांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलली किंवा साम्राज्यशाहीला इतिहासाच्या मा
दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील साम्राज्यवादाच्या समर्थनार्थ मांडणी करणाऱ्या इतिसज्ञांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलली किंवा साम्राज्यशाहीला इतिहासाच्या मांडणीतून बळ मिळणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली. परंतु भारतीय समाजातील ब्राह्मणी इतिहासकारांनी मात्र आपल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाला पोषक ठरणारी इतिहासाच्या मांडणीपासून फारकत घेतली नाही. परिणामी, या देशात सामाजिक स्वातंत्र्य प्रथम व राजकीय स्वातंत्र नंतर अशा भूमिकेचा ब्राह्मणी राष्ट्रवादाने टिळकांच्या नेतृत्वाखाली गळा आवळला, तो आता सामाजिकच नव्हे तर राजकीय स्वातंत्र्यानेही अंतिम घटका मोजण्याच्या अवस्थेला आणून सोडला. भारतीय समाजकारण किती महत्वपूर्ण आहे, याची पहिली नि:संदिग्ध ग्वाही क्रांतीबा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम या देशात दिली. मात्र त्यांनी उभारलेले समाजकारण हे जातीनिर्मूलनाचे ध्येय घेऊन उभे असल्याचे सत्यशोधक चळवळ पुढे नेऊन ब्राह्मणी व्यवस्थेशी तडजोड करित केवळ राजकीय सत्ता संपादनात धन्यता मानणाऱ्या मराठा नेतृत्वाने महाराष्ट्रात आणि उर्वरित त्या – त्या राज्यातील सत्ता धन्य झालेल्या ब्राह्मणेतर जातींनी आजचे देशासमोरिल सामाजिक आणि राजकीय फॅसिझम आणण्यात आपला अजाणतेपणी का असेना पण आपला सहभाग दिला, असे खेदाने म्हणावे लागेल ; यात फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या राजकीय /सामाजिक संघटनांचा देखिल अपवाद करता येणार नाही! महात्मा गांधींच्या नेमस्त नेतृत्वात देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे एक वेळा मान्य केले तरी; सत्तेचाळीसला मिळालेल्या राजकीय सत्तेच्या परिघात काँग्रेसची सत्ता जहाल किंवा मवाळ असा फरक न करता सनातन ब्राह्मणांच्या हातात विसावली. याचा परिणाम स्वातंत्र्योत्तर काळात पारंपरिक जातिव्यवस्थेच्या सांस्कृतिक परंपरेला उखडून लोकशाही संस्कृती रूजवण्याचा पहिल्या दशकातच जर काँग्रेसी सत्तेने कार्य केले असते तर आज देशात उफाळलेला ब्राह्मणी फॅसिझम तिथेच गतप्राण झाला असता. परिणामी प्रथम क्रांतीबा फुले आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीने उभे जातीविनाशाचे तत्वज्ञानही तेथेच खुडून टाकण्याचे फॅसिझमच्या पायाभरणीचे कार्य काँग्रेसने केलेले कार्य आज त्यांच्याच अस्तित्वावर उठले आहे. फुले – आंबेडकर यांनी भारत या देशाला राष्ट्र बनविण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्या अनुषंगाने विचार करताना प्रत्येक क्षेत्रात देश स्वयंपूर्ण करणे, हे ध्येय त्यांनी आमच्या पुढे ठेवले. या देशातील उच्च-जातवर्णिय या ध्येयाच्या विरोधात होते व आहेत. म्हणूनच जागतिकीकरणाच्या काळापूर्वीच त्यांची मुले देशाच्या साधन-स्त्रोतांचा उच्च शिक्षणासाठी उपभोग घेऊनही सेवा मात्र विदेशात जाऊन देत होते. हा प्रश्न ब्रेनड्रेन चा प्रश्न म्हणून चर्चेला घेतला जात असे. परंतु खरे तर उच्च जातीयांनी केलेला तो देशद्रोह होता. याउलट जागतिकीकरणानंतर त्यांची मुले सिलिकॉन व्हॅलितून भारतात परतली ती या देशातील सत्ता हातात घेण्यासाठी! याउलट ते जागतिकीकरणाच्या अरिष्टामुळे परतली म्हणून त्यांना देशात सहानुभूती मिळत होती. खरेतर सिलिकॉन व्हॅलितून परतणारे जगातील भांडवदारांशी हातमिळवणी करूनच देशात दाखल झाले होते. एकूणच देशाला समजून घेताना बहुजनांसाठी हे महत्वपूर्ण आहे!
COMMENTS