तरुणाचा जिल्हा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्या

तरुणाचा जिल्हा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील तरुण ऋषिकेश विठ्ठल डव्हाण याच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण

कु. गुंजन अग्रवालचा सत्कार
मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नांत वडील, मामाचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN
लोकनेते विनायकराव मेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण 14 ऑगस्ट रोजी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील तरुण ऋषिकेश विठ्ठल डव्हाण याच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा आपला काहीही संबध नसताना विनाकारण गोवण्यात आले आहे.या सर्व मनस्तापातुन अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी हा गुन्हा दाखल असला तरी त्याचा अद्याप तपास सुरु आहे. तपासा नंतर त्याचा गुन्ह्याशी संबध आहे किंवा नाही हे समजणार आहे. राहुरी तालुक्यातील बाभुळगाव या भागातील ऋषिकेश विठ्ठल डव्हाण या तरुणावर राहुरी पोलिस ठाण्यात काही दिवसापुर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा आपला काहीही संबध नाही.या गुन्ह्यातुन बाहेर पडण्यासाठी तो नगर येथिल न्यायालयातील एका वकीलास भेटले त्या वकीलाने गुन्हा दाखल झाल्यावर प्रक्रीया मधुन जावे लागते असे सांगितले.न्यायालयात लढण्यासाठी लागणारा खर्चाचा अकडा ऐकुन डव्हाण याचे डोळे पांढरे झाले. जो गुन्हा केला नाही त्यासाठी एवढा मोठा खर्च कोठुन करायचा या विवंचनेतुन त्याने अहमदनगर जिल्ह्रा न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतुन घेत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.प्रसंगवधान राखीत बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनी व कोर्ट परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी धावत जाऊन वाचवले आहे. जखमी डव्हाण यास तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

      

COMMENTS