आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पुण्यात केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पुण्यात केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध

चक्क खून करून पोलिसांना करायचा चेलेंज LOKNews24
मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम | LOKNews24
मतदान आणि आयोग !

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. पुण्यात दाखल झालेल्या कलमांमध्ये ५००, ५०१, १५३अ, ५०५, २९५अ या कलमान्वये केतकी चितळेसह वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.

COMMENTS