लघुपट व माहितीपट महोत्सवात ‘महासत्ता’, विद्यार्थी गटात ‘उंबरा’ ने मारली बाजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लघुपट व माहितीपट महोत्सवात ‘महासत्ता’, विद्यार्थी गटात ‘उंबरा’ ने मारली बाजी

अहमदनगर: येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १५ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्स

वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये
सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट

अहमदनगर: येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १५ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये खुल्या गटात लातूर येथील विक्रम बोळेगावे दिग्दर्शित ‘महासत्ता’ तर विद्यार्थी गटामध्ये पुणे येथील अतुल झांजड दिग्दर्शित ‘उंबरा’ हे लघुपट सर्वोकृष्ट ठरले. तर माहितीपट गटामध्ये ओरिसा येथील अंकितकुमार साहू व ओमप्रकाश रौत्राय यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रघुराजपूर: द लँड ऑफ आर्टीसन्स’ या माहितीपटाला प्रथम क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून काम करणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. मिथुनचंद्र चौधरी आणि सुप्रसिद्ध चित्रपट संकलक टीन्नी मित्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १५ व्या प्रतिबिंब या राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाचे समारोप आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा १३ मे रोजी सायंकाळी महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सचिव मा. जी. डी. खानदेशे होते. संज्ञापन विभागाचे प्रमुख प्रा. संदिप गिऱ्हे यांनी प्रास्ताविक केले.
मा. जी. डी. खानदेशे यांनी संज्ञापन अभ्यास विभागाने केलेल्या कार्याबद्दल प्रशंसा केली. या विभागामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्री अहमदनगरला येत आहे. कमी पैशात इथे लोकेशन्स, कलाकार व साधने उपलब्ध होतात असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य बी. एच. झावरे, प्रा. मिथुनचंद्र चौधरी आणि टीन्नी मित्रा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. परीक्षकांनी प्रत्येक विजेत्या लघुपट व माहितीपटाबाबत आपण त्याची निवड का केली याबाबत मत व्यक्त केले. महोत्सव संयोजक प्रा. अभिजीत गजभिये यांनी पाहुण्यांचा परिचय व पारितोषिकांची घोषणा केली. सूत्रसंचालन रामदास घुटे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, डॉ. ए. ई आठरे, रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. पोकळे, विविध विषयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व अहमदनगर शहरातून चित्रपट प्रेमी बहुसंख्याने उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी मानले.         स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे  (खुला गट) लघुपट प्रथम– महासत्ता- (दिग्दर्शक- विक्रम बोळेगावे), लातूर द्वितीय– अंकुर – (दिग्दर्शक- मोहन धुलधार), पुणे ,तृतीय– बेलोसा- (दिग्दर्शक– मनोज भांगे), रायगडउत्कृष्ट दिग्दर्शन- (महासत्ता) विक्रम बोळेगावे, लातूर उत्कृष्ट छायाचित्रण– (बेलोसा) चैतन्य साळुंखे, पुउत्कृष्ट संकलन– (महासत्ता) प्रदीप पाटोळे, पुणे(विद्यार्थी गट) लघुपट प्रथम– उंबरा– (दिग्दर्शक– अतुल झांजड), पुणे द्वितीय– तिकीट– (दिग्दर्शक– हितन धाकतोडे), अहमदनगर उत्कृष्ट दिग्दर्शक– (उंबरा) अतुल झांजड, पुणे उत्कृष्ट संकलक– (उंबरा) प्रफुल्ल कारले, अहमदनगर .माहितीपटप्रथम– रघुराजपूर: द लँड ऑफ आर्टीसन्स – (दिग्दर्शक– अंकितकुमार साहू, ओमप्रकाश रौत्राय), ओरिसा द्वितीय- साबर्णमती- (दिग्दर्शक– दिव्यम चतुर्वेदी), गुजरात

COMMENTS