राज्याला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कमी : आरोग्यमंत्री टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कमी : आरोग्यमंत्री टोपे

मुंबई/प्रतिनिधी : जगातील इतर देशात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असून, कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इतर देशांनी चांगलांच धसका घेतला आहे. मात्र भारतात अजूनही

पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
खासगी हॉस्पिटल्स बदनामीच्या गर्तेत ; आक्षेपांकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष?
जायकवाडीला पाणी सोडण्याचा घातक निर्णय शासनाने घेऊ नये ः शिंदे

मुंबई/प्रतिनिधी : जगातील इतर देशात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असून, कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इतर देशांनी चांगलांच धसका घेतला आहे. मात्र भारतात अजूनही कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात असल्यामुळे राज्याला अद्याप कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कमी असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
राज्यात रूग्णवाढीचा दर कमी आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट जूनमध्ये धडकणार असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का, अशी चर्चा होत आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी, राज्यातील रूग्णवाढीचा दर कमी आहे, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. राज्याला चौथ्या लाटेचा धोका कमी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS