महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत

अहमदनगर  :- जिल्हयातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओबीसी) थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भ

गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचे बोंबाबोंब आंदोलन
अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत
शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात दलालाकडून लूटमार

अहमदनगर  :- जिल्हयातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओबीसी) थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी सवलत (OTS) योजना दिनांक ३१.०३.२०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे. तरी थकीत कर्ज असणा-या लाभार्थीने योजनेचा लाभ घेवून कर्ज खाते बंद करावे असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS