राजस्थानमध्ये भोंग्यावरुन दगडफेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजस्थानमध्ये भोंग्यावरुन दगडफेक

इंटरनेट सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद

जोधपूर/वृत्तसंस्था : महाराष्ट्रात भोंग्यावरून सुरू असलेले वातावरण तापलेले असतांनाच, राजस्थानमध्ये भोंग्यावरून दोन गटात दगडफेक झाल्याचे बघायला मिळाले

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर
बारा हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – अभिजीत राऊत 
लोकसभा अध्यक्षपदासाठी जेडीयूची तयारी

जोधपूर/वृत्तसंस्था : महाराष्ट्रात भोंग्यावरून सुरू असलेले वातावरण तापलेले असतांनाच, राजस्थानमध्ये भोंग्यावरून दोन गटात दगडफेक झाल्याचे बघायला मिळाले आहे. ईदच्या पूर्वसंध्येला राजस्थानच्या जोधपूरमधील जालोरी गेटवर ध्वज आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त, एसएचओ यांच्यासह अनेक जण जखमी झाले.
अर्ध्या तासाच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. दुसरीकडे जोधपूरमध्ये अनिश्‍चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला होता. शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटविण्यावरून रात्री 11.30 वाजता दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. दरम्यान, या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. जालोरी गेट चौकात हिंदू ध्वज काढून मुस्लिम ध्वज लावण्यावरून वाद सुरू झाला. जालोरी सर्कलजवळ बॅनरही लावण्यात आले तसेच लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज आणि ईदशी संबंधित बॅनर लावण्यात आल्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. निदर्शकांनी झेंडा आणि बॅनर काढून टाकल्याने गोंधळ झाला. इतर समाजातील लोक संतप्त झाले आणि दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, वाहनांचे नुकसान झाले, जमावाने लाऊडस्पीकरही खाली पाडले. मात्र अर्धा तास दगडफेक थांबली नाही तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज करूनही दगडफेक थांबत नसताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. रात्री उशिरा शहरात झालेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सियाग यांच्यासह दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. या सर्व प्रकारादरम्यान जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. रात्री उशिरा पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सूरसागरचे आमदार सूर्यकांता व्यास आणि महापौर विनिता सेठ घटनास्थळी पोहोचले. जालोरी गेट पोलीस चौकीबाहेर बसून दोघांनी एकीकडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याचे आमदार सूर्यकांता व्यास यांनी सांगितले. मग पोलिसांनी एकीकडे लाठीमार का केला? त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरा जोधपूर शहरात दगडफेकीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दुपारी दोन वाजता शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जारी केले. मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून इंटरनेट सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

झेंडे आणि भोंग्यावरुन दोन गट भिडले
राजस्थानमधील जोधपूरमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झेंडे आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गट समोरासमोर आले. यादरम्यान रात्री उशिरा येथील जालोरी गेट चौकात दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला पांगवले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला तेव्हा एका गटाने पोलिसांवर दगडफेकही केली. यामध्ये 4 पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समज देऊन प्रकरण शांत केले. मात्र, रात्री उशिरा एका समाजाचे लोक परत आल्याने प्रकरण पुन्हा तापले.

COMMENTS