सर्व शासकीय रुग्‍णालय आणि आरोग्‍य केंद्रात लसीकरणाच्‍या सुविधा मोफत : डॉ. ज्‍योती मांडगे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व शासकीय रुग्‍णालय आणि आरोग्‍य केंद्रात लसीकरणाच्‍या सुविधा मोफत : डॉ. ज्‍योती मांडगे

अहमदनगर :- राज्‍य सरकारच्‍या सर्व शासकीय रुग्‍णालये आणि आरोग्‍य केंद्रामध्‍ये लसीकरणाच्‍या सुविधा मोफत असून जनतेने खाजगी रुग्‍णालयातील महागड्या लसी न

बाराशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘विक्रम’ लँडरचे चित्र रेखाटून शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
रिक्षा व टॅंक्सीचालकांना शासनाने अनुदान दयावे : कोल्हे
बेलापूर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
अहमदनगर :- राज्‍य सरकारच्‍या सर्व शासकीय रुग्‍णालये आणि आरोग्‍य केंद्रामध्‍ये लसीकरणाच्‍या सुविधा मोफत असून जनतेने खाजगी रुग्‍णालयातील महागड्या लसी न घेता शासकीय रुग्‍णालय आणि केंद्रांतुन आपल्‍या मुलांचे लसीकरण करून घ्‍यावे असे आवाहन नगर तालुक्‍याच्‍या तालुका आरोग्‍य अधिकारी ज्‍योती मांडगे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगर व आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृह, बूऱ्हाणनगर, ता.जि. अहमदनगर येथे जागतिक लसीकरण आठवडा (24-30 एप्रिल,2022) विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी बु-हाणनगर ग्रामपंचायत सरपंच रावसाहेब कर्डिले, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. ज्‍योती मांडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. के. कोटुळे, साथरोग अधिकारी डॉ. वैष्‍णवी गोपाळघरे, साथरोग अधिकारी डॉ. तृप्‍ती कोटुळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार आदी मान्‍यवर उपस्थित होते. कोविड 19 चे संपूर्ण लसीकरण करण्‍यासाठी नगर तालुक्‍यातील सर्व शासकीय प्राथमिक आरोग्‍य केंद्रांद्वारे प्रचार आणि प्रसार करुन लसीकरणाचे उद्दिष्‍ट पूर्ण केल्‍याचे डॉ. मांडगे यांनी सांगितले. यावेळी डॉ. वैष्‍ण्‍वी गोपाळघरे आणि डॉ. तृप्‍ती कोटुळे यांनी केंद्र सरकार तसेच राज्‍य सरकार चालवण्‍यात येणा-या लसीकरण कार्यक्रमांचे इ‍त्‍यंभूत माहिती देऊन सर्व जनतेने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्‍यावा असे सांगितले. बु-हाणनगर ग्रामपंचायतीचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी शासनाच्‍या आरोग्‍य विषयक योजनांचा प्रचार आणि प्रसार केल्‍याचे सां‍गून प्राथमिक आरोग्‍य केंद्रातर्फे गावांतील जनतेला चांगली आरोग्‍याची सेवा मिळत असल्‍याचे सांगितले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकपर भाषणात जागतिक लसीकरण आठवडा (दि. 24 ते 30 एप्रिल 2022) व केंद्र सरकारतर्फे लसीकरण संदर्भातील मोहिमेची माहिती दिली. आशा कार्यकर्त्‍यांची वक्‍तृत्‍व स्‍पर्धा आणि अंगणवाडी कार्यकर्त्‍यांची सकस आहार स्‍पर्धांचे याप्रसंगी आयोजन करण्‍यात आले होते. विजेत्‍या स्‍पर्धकांचा मुख्‍य कार्यक्रमांत पारितोषिके देऊन सन्‍मान करण्‍यात आला. जयहिंद लोक कलामंचाचे शाहीर हमीद सय्यद यांनी आपल्‍या गायनातुन लसीकरण मोहिमेचे महत्‍व पटवुन देत प्रबोधन केले. या कार्यक्रमास गावांतील ग्रामस्‍थ, अंगणवाडी आणि आशा कार्यकार्त्‍या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्‍या. कार्यक्रमाचे आभार वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. के. कोटुळे यांनी केले.

COMMENTS