मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी कचराप्रश्‍नी आंदोलन पवित्र्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी कचराप्रश्‍नी आंदोलन पवित्र्यात

शहर जिल्हाध्यक्षांनी दिला इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत शिवसेनेला सत्तेवर बसवून उपमहापौरपदाच्या माध्यमातून या सत्तेचा भाग झालेल्या राष्ट्रवादीने नगर शहरातील कचरा प्रश्‍नी चक्

अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण
रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठेचा जामिनासाठी अर्ज l LokNews24
आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत शिवसेनेला सत्तेवर बसवून उपमहापौरपदाच्या माध्यमातून या सत्तेचा भाग झालेल्या राष्ट्रवादीने नगर शहरातील कचरा प्रश्‍नी चक्क आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनपातील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादीची एकीकडे सत्ता सांभाळताना दुसरीकडे नागरी प्रश्‍नांसाठीची आंदोलने चर्चेची झाली आहेत.
साचलेल्या कचर्‍याच्या ढिगामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत तरी लवकरात लवकर साचलेला कचरा उचलण्यात यावा, अन्यथा मनपात आंदोलन करू असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे मंगळवारी देण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, अर्बन सेलचे प्रा.अरविंद शिंदे, सागर गुंजाळ, गणेश बोरुडे, वैभव ढाकणे, अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर, जॉय लोखंडे आदी उपस्थित होते.
याबाबत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांनी सांगितले की, शहरात प्रतिदिन उचलल्या जाणार्‍या कचर्‍याबाबत मनपाचा घनकचरा विभाग व एजन्सीच्या दिरंगाईमुळे शहरामध्ये मोठ-मोठे कचर्‍याचे ढीग निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाचा कचरा संकलन करणार्‍या एजन्सीवर कोणत्याही प्रकारचा धाक उरला नसल्यामुळे शहराच्या चौकात, बाजारपेठामध्ये, रस्त्यांच्या दुत़र्फा व रस्त्यांवर कचरा साचलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत मिळत आहे. या माध्यमातून कचर्‍याचे योग्य रितीने संकलन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील कचर्‍याचे व्यवस्थापन केले नसल्याने कचर्‍याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट झाले आहेच, याच बरोबर नागरिकांच्या आरोग्यविषयक गंभीर प्रश्‍न उद्भवू लागला आहे. त्यामुळे घनकचरा हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर अशी समस्या बनू लागली आहे, असा दावा त्यांनी केला. हे प्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कचरा संकलनास गती देऊन उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबींचा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक विचार करून महापालिका हद्दीतील कचरा संकलनास गती देऊन योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत संबंधितांना आदेश करावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी, येत्या तीन दिवसात कचरा संकलन आता प्रश्‍न मार्गी लावू अन्यथा एजन्सीवर दंडात्मक कारवाई करू, असे शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले.

COMMENTS