Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढाकणी येथील कुस्ती मैदानात पै. गणेश कुंकुले याने पटकावली चांदीची गदा

गोंदवले / वार्ताहर : ढाकणी, ता. माण येथील श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पिंपरीच्या पै. गणेश कुंकुले याने पुणेच्या पै. जयदिप

आ. जयंत पाटील यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी : पाच अटकेत
महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न

गोंदवले / वार्ताहर : ढाकणी, ता. माण येथील श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पिंपरीच्या पै. गणेश कुंकुले याने पुणेच्या पै. जयदिप गायकवाड यास चितपट करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस व चांदीची गदा पटकावली. ही कुस्ती कै. संजय खाडे यांचे स्मरणार्थ उद्योजक हर्षवर्धन खाडे व विक्रांत खाडे यांचे वतीने लावण्यात आली होती.
दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या पै.अमित पाटील याने हरियाणा केसरी पै. अशोक कुमारला चितपट केले. ही कुस्ती कै. आप्पासो खाडे यांचे स्मरणार्थ ग्रामसेवक मल्हारी खाडे यांचे वतीने लावण्यात आली होती. तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या पै. राघू ठोंबरे याने पंढपूरच्या पै. तात्या जुंमाळेवर मात केली. ही कुस्ती कै. महादेव खाडे यांचे स्मरणार्थ राजाराम खाडे यांचे वतीने लावण्यात आली होती. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. प्रकाश नरुटे व पै. उदय खांडेकर यांची बरोबरीत सुटली. ही कुस्ती कै. पोपट नरबट यांचे स्मरणार्थ शंकर नरबट यांचे वतीने लावण्यात आली होती. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती पै. भैय्या चव्हाण व पै. संग्राम साळुंखे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. ही कुस्ती कै. बाबू जाधव यांचे स्मरणार्थ केंद्रप्रमुख अरुण जाधव यांच्या वतीने लावण्यात आली होती. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. गणेश जाधव याने पै. प्रतिक माने याच्यावर मात केली. ही अर्जुन खाडे फौजी यांचे वतीने लावण्यात आली होती.
या कुस्ती मैदानासाठी वस्ताद शिवाजी दिडवाघ, वस्ताद रावसाहेब कोळपे, पै. सत्यवान दिडवाघ, राजभाऊ विरकर, वस्ताद पोपट रुपनवर, सरपंच सज़य दिडवाघ, पै. लूनेश गोरड, वस्ताद नवनाथ खांडेकर, मारुती नरबट, सतीश सुर्यवंशी, पै. नाना खांडेकर यांनी पंच म्हणून काम केले तर कुस्ती समालोचन परशुराम पवार यांनी केले.

COMMENTS