मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र अस्थिर असल्याच्या वावड्या उडवल्या जात आहेत. त्यांना संदर्भ आहे भाजपला महाराष्ट्रात सत्ता नाही याचे. सर्वाधिक आमदार
मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र अस्थिर असल्याच्या वावड्या उडवल्या जात आहेत. त्यांना संदर्भ आहे भाजपला महाराष्ट्रात सत्ता नाही याचे. सर्वाधिक आमदार असतांना सत्ता नसल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप अस्थिर असणे तसे साहजिकच. पण ती खडखड नेहनीच्या वागण्या बोलण्यातून काढणे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत देणे यावरून राज्यात कोण अस्थिरता निर्माण करतंय हे जनतेला कळणारे नाही असे अजिबात किमान भाजपने समजू नये. राज ठाकरे यांच्या सोबत हातमिळवणी करण्यासाठी त्यांच्या भोंग्याचे समर्थन हे अस्थिरतेचे वर्तन नव्हे काय? केंद्रात भाजप सत्तेत आहे मग देशातील जनता सुरक्षित आहे का? किंबहुना सत्ता कुणाचीही आणि कुठल्याही पक्षाची असो, हिंसाचार नेमक कोण घडवत असत? यांच्या मुळात गेल्याशिवाय ही हिंसा कशी थांबवणार? भारत देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून ज्या- ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या त्या कुणी घडवल्या? यांच्या खोलात न जाता त्या कुठल्या मुद्यावर घडल्या हे तपासणे क्रमप्राप्त. यात प्रामुख्याने मुद्दा उपस्थित होतो मशीद आणि राम मंदिराचा. हा वाद तसा सर्वच पक्ष्यांच्या फायद्याचा असतो. म्हणजे, भाजप किंवा हिंदुत्ववादी कुठल्याही पक्षाने राममंदिराच्या मुद्यावर भावना भडकावून देणारे भाषण केले की, आपल्याकडे दंगली घडायला सुरुवात होते. भावना भडकावून देणारे दंगलीमध्ये कधीच नसतात. त्यांचे मुले- बाळे देखील नसतात. यात असतात सर्वसामान्यांचे मुले. आता यात मरणारे आणि मारणारे हेच सर्वसामान्य असतात. मग या दंगलीत जे गमावले जाते ते सर्वसामान्यांचेच. मुद्दा असा आहे की, सर्वसामान्यांच्या भावना दुखतातच कशा? जर खरंच राममंदिर, मशीद आणि इतर धार्मिक वादग्रस्त मुद्यामुळे भावना दुखत असतील तर दंगल हा विलाज नाहीच. त्यासाठी आपल्याकडे मोठमोठे दवाखाने आहेत. ज्यांच्या कुणाच्या भावना दुखतात त्यांच्या भावनेचे ऑपरेशन होईल त्यासाठी दंगल कशाला? आता हे दंगल घडवणारे दुसरे कुणी नसून आपलेच धोरणकर्ते असतात हे सर्वाना माहित असते. विशेष म्हणजे पोलिसांना तर नक्की माहित असतेच. मग पोलिसांना माहित असतांना दंगल घडतेच कशी? तर ती पुरनियोजीत नसते का? हे सर्वसामान्य जनतेने लक्षात घेतले पाहिजे. आपण ज्या व्यवस्थेत किंबहुना ज्या देशात राहतो तो देश धर्म भावनेपेक्षा महत्वाचा आहे. इथे धर्म हितापेक्षा देश हित अधिक महत्वाचे आहे. जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे. समजा देशाचं सुरक्षित नसेल तर तुमच्या धर्माचे काय? त्यामुळे सामान्य जनतेने कुठल्याही भूल- थापना बळी न पडणे सर्वांच्या हिताचे असते. राज्यात असुरक्षितता आहे असे सर्व विरोधी नेते मंडळी म्हणत आहेत. पण महाराष्ट्र कुणामुळे असुरक्षित आहे हे ते सांगत नाहीत. खरंच महाराष्ट्र असुरक्षित आहे का? असेल तर देश असुरक्षित नाही काय? या प्रश्नाचे उत्तर भाजप मंडळींना देता येणारे नाही. तसे ते कुणालाच द्यायचे देखील नाही. कारण सर्व प्रमुख पक्षांचे निवडणुकांचे अजेंडे हे धर्मकेंद्रित आहेत. आता राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा विषय. यावर एवढी चर्चा करायची काय गरज? फाजूल गोष्टीला जेव्हा अधिक महत्व दिलं जात तेव्हा काहीतरी घडत असत हे नक्की. मग तो मुद्दा कुठलाही असो. किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी दगडानं बदडल. यावर देवेंद्र फडणवीस लगेच म्हणतात की, महाराष्ट्र असुरक्षित आहे. पण इथे दिवस ढवळ्या खून, दरोडे, बलात्कार होतात तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित नसतो का? हे फडणवीस यांना का कळत नाही? आपले राज्य किंवा देश कुणामुळे संकटात असेल तर तो आहे अंतर्गत धार्मिक कट्टरतावादामुळे. हा कट्टरतावाद इथे कुणी पेरला? ज्या जमातीने किंवा त्यांच्या पूर्वजांनी पेरला त्यांनाच धोक्याची ‘घंटा’ बरी दिसते. मंदिरात घंटा वाजवणाऱ्या या लोकांनी शाळेची ‘घंटा’ वाजू दिली नाही. आणि पुन्हा भविष्य सांगतात, महाराष्ट्र असुरक्षित आहे म्हणून. असुरक्षित पण कुणामुळे?
COMMENTS