Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरात दूषीत पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सुजित थोरात

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरासह उपनगरात गेले अनेक दिवस दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची माहिती महाडिक युवाशक्तीचे

जागृत शेतकरी अपप्रचारास बळी पडणार नाही : आ. जयंत पाटील
सातारा जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविणार : पालकमंत्री
पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरासह उपनगरात गेले अनेक दिवस दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची माहिती महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजीत थोरात यांनी पत्रकाद्वारे दिली.
अशुध्द व दूषीत पाणी पुरवठा होत असल्याने नागारिकांना पोटाचे अनेक त्रास होत आहेत. पोटदुखी, जुलाब, गॅस्ट्रो यासारख्या आजारांसाठी उपचार घेण्याची वेळ आली आहे. काही नागरिकांना मोठ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्याची वेळ येत आहे. एकीकडे पाणीपट्टी झालेली वाढ आणि अशुध्द पाणी येत आहे. यामध्ये नागरिक भरडले जात आहेत.
मुख्याधिकार्‍यांनी जाहीर केलेली 500 बोगस कनेक्शन कोणाची? कायदयाचा बडगा सामन्य कर धारकानाच का? काही भागात पाणी फक्त10 मिनिटे तर काही भागात दिवसभर पाणी असते, अशी तफावत का?
त्यावर प्रशासक कधी बोलणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
पिण्याचे पाणी चेक करण्यासाठी नगरपालिलेकडे मान्यताप्राप्त अधिकारी नाही. जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटत आहे. गटारीतील पाणी त्यात जात आहे ती कधी बदलणार? याबद्दल इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी दिली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा धंदा नगरपालिकेने बंद करावा. आणि व्यवस्था सुधारावी. अन्यथा नागरिकांकडून पाणीपट्टीची अपेक्षा करू नये, असा इशारा महाडीक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी दिला.

COMMENTS