मुंबई : मशिदीवरील भोंगाविरोधी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेमध्ये असलेले मुस्लिम कार्यकर्ते दुखावले असून, अनेक कार्यकर्त्या
मुंबई : मशिदीवरील भोंगाविरोधी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेमध्ये असलेले मुस्लिम कार्यकर्ते दुखावले असून, अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे द्यायला सुरूवात केली आहे. मनसेची ही भूमिका आता कडव्या हिंदुत्वाऐवजी मनसेच्या गळतीला कारणीभूत ठरतांना दिसून येत आहे. मुंबई आणि मराठवाडयातील तब्बल 35 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर ही गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर एका मागे एक मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने याचा काहीसा फटका आगामी मनपा निवडणुकांत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले. मात्र, राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यातील माझीद अमीन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष आहेत. अमीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयांवर भर दिला जात आहे, या कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. पण, पक्षातूनच त्यांच्या भूमिकाला विरोध झाला. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला म्हणून आता त्यांना बाहेरच रस्ता दाखवला आहे. पुणे शहराध्यक्षपदी आता नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची निवड केली आहे. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली.
COMMENTS