डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील तणावप्रकरणी सात गुन्हे दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील तणावप्रकरणी सात गुन्हे दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेले तणाव, झालेले वाद व दगडफेक तसेच डीजेद्वारे झालेले ध्वन

रेमडीसीवीर…काहींना कोटा सिस्टीमने तर काहींना सहज मिळतात
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेले तणाव, झालेले वाद व दगडफेक तसेच डीजेद्वारे झालेले ध्वनीप्रदूषण आदींच्या अनुषंगाने नगरच्या पोलिसांनी तब्बल सहा गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांत काही आरोपी पकडण्यात आले असून, काहींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या सर्व प्रकरणांतून मिळून 34जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय भिंगारच्या मिरवणुकीतही मारहाणीची घटना घडली. त्यामुळे आंबेडकर जयंती मिरवणुकीतील विविध घटनांच्या अनुषंगाने सात गुन्हे दाखल झाले आहेत. दोन वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या उत्साहात होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात जोरदार घोषणाबाजी होऊन मिरवणुकीवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याशिवाय भिंगारलाही मारहाणीची घटना घडली तर नगरमध्ये आशा टॉकीज चौकात घोषणायुद्ध रंगले. तसेच मिरवणुकीत डीजे लावून व त्यावर दणदणाटी आवाजात गाणी लावून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले आणि ध्वनीप्रदूषण केल्याने या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS