भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ

महाराष्ट्रात दिवसोंदिवस एक- एक भ्रष्टाचार उघड होत आहे. ईडीच्या कारवायाही मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. याच्या मागे राजकारण असले तरी महाराष्ट्रात भ्रष्ट

अवैध प्रमाणपत्रे सरकारी अडचण ?
तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

महाराष्ट्रात दिवसोंदिवस एक- एक भ्रष्टाचार उघड होत आहे. ईडीच्या कारवायाही मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. याच्या मागे राजकारण असले तरी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून जे-जे आर्थिक बलाढ्य झाले आहेत त्यांना तुरुंगात टाकणे योग्यच. मग तो कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा असो. राजकीय वर्तुळात सर्वच नेते एक-दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. विशेष म्हणजे ते पुराव्यासह. असे गैर व्यवहार महाराष्ट्रात होत असतांना हे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसत का नाही?   ईडी काय करते? ईडी भाजपच्या इशाऱ्यावर चालते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय, ज्याला इन्फोर्समेंट डिरेक्टरेटही म्हटलं जातं. 1 मे 1956 मध्ये ईडीची स्थापना झाली. हीच मुख्य कार्य आहे, भारतातील आर्थिक घोटाळ्याचा तपास करणं. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाअंतर्गत ईडी काम करतं. ईडीकडे आर्थिक अनियमिततेची तक्रार झाल्यानंतर किंवा ईडीच्या तसे लक्षात आल्यानंतर ते कारवाई करतात. पण अलीकडे ईडी ही भाजप नेत्यांची जावई झाल्यासारखे चित्र आहे असा संशय सर्वांच्याच मनात आहे. कारण भाजप नेते सोडून बाकी साऱ्यांना ईडी नोटीस बजावतांना तसेच ताब्यात घेतांना दिसते. मग भाजप नेत्यांनी कधी भ्रष्टाचार केलाच नाही काय? भाजप नेत्यांवरही भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप आहेत. त्यात सत्यताही असणे संभव. पण आपल्याकडे एक म्हण आहे, ‘ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी’. पारधी ही एक जात. तीच्यावर चोरी करण्याचा व्यवस्थेने पडलेला शिक्का आहे. आता ज्यानी पारध्यांचा जीवन संघर्ष पाहिला आहे त्याला ही म्हण अजिबात आवडणारी नाही. कारण ते जर चोरी करत असते तर ते गडगंज संप्पती कमाऊ शकले असते. पण तसे चित्र अजिबात नाही. पारधी तर आजही फाटक्या पालात राहतात. मग पारध्याला का बदनाम करायचं? आता खरे चोर कोण असा प्रश्न उपस्थित राहतो. तर आपल्या देशात धोरणकर्ती जमात चोर आहे. किंबहुना अपवाद वगळता राज्याच्या आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत जे आहेत ते सारे चोर किंवा भ्रष्टाचारी. मग आपल्या राजकीय निर्णय प्रक्रियेचा पाया काय आहे? तर तो आहे धर्म. तो असा की, सर्वच राजकीय पक्ष हे धर्माच्या परिप्रेक्षात राजकारण करतात. त्याचे अनेक उदाहरणे. ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर, राज ठाकरे यांचे ‘मशिदींपुढे हनुमान चालीसा चालवा’ हे. मग धर्म भ्रष्टाचार करायला सांगतो का? आता इथेच खरी मेख आहे. मूल व्हावे म्हणून लोक देवाला नवस करतात. तो नवस फेडण्यासाठी लोक देवाला पेढे, साखर- खडीसाखर, बकरे- कोंबडे, नारळ, सोने- चांदी, हिरे- मोती, पैशे आदी देतात. उद्देश साध्य करण्यासाठी ही एकप्रकारची देवाला दिलेली लाच असते. मग धार्मिकदृष्टया खरे लाचखोर कोण? किंबहुना लोकांनी देवाच्या नावाने दिलेला दानधर्म ( लाच ) कुणाच्या घरात जाते. तर ती धर्मावर प्राबल्य असलेल्या पुरोहित ब्राम्हण यांच्या घरात. त्यामुळे आपली धार्मिक व्यवस्था भ्रष्टाचाने बरबटलेली आहे का? आपली राजकीय व्यवस्था भ्रष्टाचाने ग्रस्त आहे याचे कारण, आपली राजकीय व्यवस्था धार्मिक व्यवस्थेतून राजसत्तेवर बस्तान मांडतात. त्यामुळे धार्मिक भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाल्याशीवाय राजकीय भ्रष्टाचाराचे निर्मूलन कसे करणार? प्राचीन काळात धर्माचे रक्षक म्हणून ब्राम्हण नैतिक व अध्यात्मिक बाबीत समाजाचे मार्गदर्शक असत आणि सध्या देखील आहेत. उपलब्ध प्रमाणानुसार एखाद्या ब्राह्मणाला केवळ सात दिवस पुरेल इतकीच अन्न सामग्री साठवून ठेवण्याचा अधिकार होता. परंतु हळू हळू त्यांनी हा नियम मोडला. प्रत्येक गोष्टीचा संग्रह करण्याची लालसाच जणू या ब्राम्हण वर्गाला जडली. अन्न, पेय, कपडे, शैय्या, सुगंधित द्रव्य, आदींचा संग्रह हे ब्राह्नण करत. त्याचेच अनुकरण इतर लोक करू लागले. आज त्याचा आवाका वाढला एवढेच. याच्या खोलात अजून गेले तर बडे- बडे देव- दानव हे भ्रष्टाचारी होते याचे पुरावे आहेत. ते देण्याची गरज नाही.  आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ दिलेले आहेत. 

COMMENTS