पांढरीपुलावर कंटेनर धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांढरीपुलावर कंटेनर धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरी पूल परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे. सोमवार, दि. 11 रोजी झालेल्या कंटेनरच्या अपघातात

आमच्यावर अन्याय करा तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो : सुजय विखे
पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…
द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरी पूल परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे. सोमवार, दि. 11 रोजी झालेल्या कंटेनरच्या अपघातात एका टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, मालवाहू टेम्पो (क्रमांक एम.एच. 12 क्यु.जी.1217) यावरील टेम्पोचालक याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून रस्त्याच्या बाजूला उभा असताना त्याला नगरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या कंटेनरने (क्रमांक आर.जे. 32 जी.बी. 0003) जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की त्या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत टेम्पोचालकाची ओळख अद्याप पटली नव्हती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

COMMENTS